बामणीच्या शिवनगर वॉर्ड मध्ये गंभीर समस्या ३०० लोकांच्या वस्तीला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम आदमी पार्टी मैदानात

Fri 27-Jun-2025,04:52 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : आम आदमी पार्टी बल्लारपूरने बामणी टी-पॉईंट येथील ब्रीज बांधकामामुळे शिवनगर वॉर्ड, बामणी ग्रामीण येथील सुमारे ३०० रहिवाशांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबाबत आपचे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. या वॉर्डातील नागरिकांसाठी आवागमनासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही, जुन्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे, आणि रात्रीच्या वेळी मार्गावर प्रकाशाची सोय नसल्याने रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, आम आदमी पार्टी, बल्लारपूरने उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांना गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी एक विशेष सभा आयोजित करण्याची विनंती केली आहे.या बैठकीत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, गटविकास अधिकारी, बामणी ग्रामपंचायत सदस्य, रोड कंत्राटदार, विद्युत कंत्राटदार व पोलीस यांचा सोबत घेऊन बैठक घेण्याची विनंती केली आहे.आम आदमी पार्टीचा उद्देश शिवनगर वॉर्डातील नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देणे आहे. ही बैठक आयोजित केल्यास वरील समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना एकत्र आणता येईल. या वेळी आप च्या पदाधिकाऱ्यांनी शिवनगर बामणी येथील नागरिकांची समस्या जाणून घेतल्या.