धोकादायक इलेक्ट्रीक तारांऐवजी जीआय (आरमोल्ड) केबल टाकण्यात यावा

Mon 23-Jun-2025,06:54 AM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदीर बख्श 

प्रभाग क्रमांक १० व ११ मधील रहिवाशांची मागणी

वर्धा:हिंगणघाट शहरातील मुळ लोकवस्ती असलेल्या तसेच अत्यंत दाटीवाटीने राहणाऱ्या व दाट लोकसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक १० व ११ येथील नागरिकांनी दोन्ही प्रभागातील प्रमुख रस्त्यांमध्ये लोंबकाळणारे इलेक्ट्रिक तार काढून त्याऐवजी जीआय (आरमोल्ड) केबल टाकण्यात यावा अशी मागणी प्र.उप कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना केली.हिंगणघाट येथील मुळ शहर असलेल्या प्रभाग क्रमांक १० व ११ मध्ये मोठ्या लोकसंख्येने व दाटीवाटीने जनता राहते. तेथे इलेक्ट्रीक पोलची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे. या भागात मागील काही वर्षांपासून सिमेंट रोड व नालीचे काम सुरू असल्याने रोड उंच झाले व इलेक्टीक तारें लोंबकाळतांना दिसताहेत तसेच या भागात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व इतर इतर धार्मिक उत्सव साजरे होतात व शहरातील गणेश मूर्ती, गौरी, देवी विसर्जानाचा मुख्य मार्ग याच भागातून जातो.त्यामुळे लोंबकाळणा-या तारांमुळे मोठी दुर्घटना जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे टिळक चौक ते भोईपुरा/संत गाडगेबाबा चौक / शितलामाता मंदिर, तेलीपुरा चौक ते चेपे चौक, टिळक चौक ते पांडुरंग बाबा मठ, मा.आमदार साहेबांचे घर ते संत गाडगेबाबा चौक , राहुल बंगाले ते नाथबुवा चौक या प्रमुख मार्गावरील लोंबकाळणारी इलेक्टीक तारें काढून त्याऐवजी जीआय (आरमोल्ड) केबल धार्मिक उत्सव सुरू होण्यापूर्वीच टाकण्यात यावा अशी मागणी या भागातील जनतेसोबतच या भागातील गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळ व मंदिर यांच्या पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे. तसेच एक वर्षापूर्वी केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात आले.यावर तत्परतेने नळे साहेब अभियंता म.रा.वि.वि.कं.यांनी दखल घेत तातडीने या भागातील प्रमुख रस्त्यांची पाहणी केली व लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी निवेदन देतांना प्रामुख्याने धनराज कुंभारे, तुषार हवाईकर, किशोर साटोने, भुषण माडेवार, संजय कावळे, नरेश कुंभारे, रोहित गुप्ता, राहुल बंगाले, पंकज पाके, संदेश डेकाटे,अशोक पवनीकर, संजय कुंभारे इत्यादी सदस्य उपस्थित होते.