बाबाटोली येथे अमली पदार्थ व्यसनमुक्त जनजागरण मोहीम

Sat 28-Jun-2025,04:52 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-नगर पंचायत क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आमगावखुर्द येथील बाबाटोली येथे सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत दादालोरा खिडकी योजना तसेच तिष्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था व बाबटोली सुधार समिती द्वारा आम्ल पदार्थ व्यसनमुक्त जनजागरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये लहान मुलांना , युवकांना, युवती, महिलांना व्यसनमुक्त राहण्याकरिता संबोधन जनजागरण करण्यात आले.व्यसनापासून दूर राहावे ,आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे यामुळे आपल्या परिसराचा कायापलट नक्किच होणार असे व्यक्तव्य आम्ल पदार्थ व्यसनमुक्त जनजागरण कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला बाबाटोली सुधार समिती चे अध्यक्ष कैलास गजभिये, उपाध्यक्ष इरफान भाई सय्यद , सामाजिक कार्यकर्ते विजय फुंडे,ब्रजभूषण बैस, मुरलीधर कावळे, बाजीराव तरोने, अरुण तावाडे , अंगणवाडी सेविका फुंडे ताई, आशा कार्यकर्ता छलीना साखरे, पोलीस कर्मचारी विशाल जनबंधू, बहेकार ताई, मदतनीस मेंढे ताई, मोनू गजभिये आणि बाबाटोली येथील महिला, युवावर्ग सर्व नागरिक उपस्थित होते.