रोटरी क्लब ऑफ वसमत चा पदग्रहण समारंभ संपन्न

Sun 17-Aug-2025,04:25 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली वसमत येथे आज लिटिल किग्स इंग्लिश स्कूल वसमत येथे प्रांतपाल श्याम गंदेवार मुरलीधर भुतडा उमेश गरुडकर डॉक्टर अंबुलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऍडव्होकेट रणधीर तेलगोटे यांची अध्यक्ष तर श्रीराम संगेवार सचिव पदी निवड करण्यात आली. युनाइट फॉर गुड ही थीम घेऊन वर्षभर समाजपयोगी उपक्रम राबवण्याचा मनोदय संकल्प करण्यात आला. या प्रसंगी उगम चे जयाजी पाईकराव मराठा सेवा संघांचे तानाजी भोसले व्यापारी संघांचे बाळासाहेब जाधव डॉक्टर गुट्टे प्रा.पावरा सर डॉ.संगेवार इ.मान्यवर उपस्थित होते तर सूत्रसंचालन शिव भगत सर यांनी केले.तसेच श्यामराव संगेवार यांनी आभार मानले.कार्यक्रम राष्ट्रगीतांनी संपन्न झाले.