श्री.किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविदयालयात वैरागड येथे स्वातंत्रदीन ऊत्सहात सपंन्न‌

Sat 16-Aug-2025,09:31 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली 

वैरागड -  श्री. किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड येथे भारताचा ७९ वा स्वतंत्र्यदिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा झाला.ध्वजारोहण सकाळी ७. ३० वा. माजी जि. प. सदस्य के. तु. गेडाम यांच्या हस्ते प्राचार्य डा. विवेक हलमारे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीत सहभाग घेतला. स्वतंत्र्यदिना निमित्य महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी भाषण, देशभक्ती गीत, देशभक्ती नृत्य, महिला सुरक्षेवर नाटिका इ. कार्यक्रम सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डा. विवेक हलमारे होते. उदघाटन संस्था सदस्य व वरिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा. धर्मेंद्र जनबंधू यांच्या हस्ते पार पडले. अतिथी म्हणून प्रा. एस. पी. बन्सोड, प्रा. डा. विलास मेश्राम, प्रा. उके, प्रा, नरेश लाडे, होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रकाश म्हशाखेत्री व प्रा. चंद्र शेखर बर्वे तर आभार प्रा. अमोल नैताम यांनी मानले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी निखिल पाटील व महेश बोदेले यांनी अथक प्रयत्न केले.