ऐतिहासिक किल्ला आणि नगर परिषद प्रांगणात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:देशभक्तीच्या वातावरणात आणि ऐतिहासिक किल्ल्याच्या वैभवशाली साक्षीने, नगर परिषद तसेच किल्ला प्रांगण येथे स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा साजरा करण्यात आला.नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण होताच उपस्थितांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.या सोहळ्यास शहरातील मान्यवर नेते,माजी नगराध्यक्ष,माजी उपनगराध्यक्ष,माजी नगरसेवक, पत्रकार, शिक्षक तसेच गांधी विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संगीता उमरे, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर सातपुते, साठा विभाग अधिकारी उपेंद्र धामणगे, लेखापाल बांगर, कर निरीक्षक गजानन आत्राम, नगर अभियंता डॉली मदन, बांधकाम अभियंता मयूर दहीकर, कृष्णा गुल्हाने, पाणी पुरवठा उप अभियंता प्रशांत गणवीर, आरोग्य निरीक्षक भूषण साळवटकर, शहर समन्वयक मयुरी भोयर तसेच सर्व लिपिक व कर्मचारी उपस्थित होते.राष्ट्रगीताच्या गजरात आणि तिरंग्याच्या वाऱ्यात फडकण्याच्या देखाव्यात, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण करून देत सर्वांनी देशसेवेची शपथ घेतली. ऐतिहासिक किल्ल्याच्या अंगणात उजळलेले हे देशभक्तीचे चित्र सर्वांच्या मनात अभिमानाची नोंद करून गेले.