केबल टाकताना विजेचा खांब पडला, तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी:-अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली,वसमत: मंगळवारी हिवरा येथे वीज खांब बसवत असताना तो तुटून पडल्याने झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाला.मृताकाचे नाव करण गावंडे (२६) असे आहे. तो वाखरी गावचा रहिवासी होता. मंगळवारी करण गावंडे केबल बसवण्यासाठी विजेच्या खांबावर चढत असताना अचानक खांब तुटल्याचे सांगण्यात आले. काम करत असताना, करण खूप उंचावरून खाली पडला.पडताना, खांबाचा एक तुकडा करणच्या छातीत घुसला आणि तो गंभीर जखमी झाला. करणला ताबडतोब वसमत येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.करण गावंडे कंत्राटावर काम करत होताघटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचेपोलिस घटनास्थळी पोहोच ले सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मृत तरुण एका कंत्राटदाराच्या हाताखाली महावितरण कंपनीसाठी वायरिंगचे काम करत होता.
Related News
उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई
5 days ago | Sajid Pathan
5 जहाल माओवादी हत्यारासह ताब्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसराततून अटक घातपात करण्याचा होता डाव
21-May-2025 | Sajid Pathan
हत्तीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची खा. डॉ.नामदेव किरसान यांनी केली प्रकृतीची पाहणी
17-May-2025 | Sajid Pathan
घरकुल योजना में मुफ्त रॉयल्टी वाली रेत का वितरण धीमा, अवैध रेत चोरी बनी बड़ी चुनौती
15-May-2025 | Sajid Pathan