नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी 24 तासाच्या आत कारवाई करत चार आरोपींना घेतलं ताब्यात

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली :वसमत शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने कुरेशी मोहल्ला येथील कत्तलखाना परिसरामध्ये धाड टाकत गोवंश जातीच्या दोन बैलांचे मांस पकडले व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शंकरराव शेडके यांच्या तक्रारीवरून गु.र.न. व कलम 0306/2023 कलम 5(ब), 5(क),9,9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारण कायदा 2015 नुसार आरोपी मोहम्मद.रियाज कुरेशी मोहम्मद हुसेन कुरेशी,युसूफ चाँद साब कुरेशी, शेख रिजवान सलीम कुरेशी व इनायत कुरेशी मोहम्मद हुसेन कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंद करत आरोपींना तात्काळ ताब्यात घेतल प्रकरणाचा पुढील तपास वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले हे करत आहेत काही दिवसांपूर्वी पत्रकार यांनी मंगळवार बाजारातून जनावरांच्या अवैध वाहतूक व कत्तली संदर्भात बातमी प्रसारित केली होती सदरची बातमी प्रसारित केल्यानंतर गुन्हेगारांवर कार्यवाही करण्या ऐवजी वसमत शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी मर पत्रकार यांनाच कोणत्या आधारे बातमी प्रसारित केली व पोलिसांना माहिती का दिली नाही या बाबत नोटीस बजावत खुलासा मागितला होता पण तरीहि न डगमगता त्यांनी सतत प्रकरणाचा पाठपुरावा केला याबाबत पोलीस उपमहानिरीक्षक यांना शिवा संघटना व राष्ट्रीय बजरंग दल यांच्यावतीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर अखेर दिनांक 11 मे रोजी वसमत शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकत मासाचा मोठा साठा पकडला.वसमत येथील कत्तलखान्यांवर पोलीस प्रशासन आणखी कार्यवाही करणार का याकडे आता सर्व वसमतवासियांचे लागले लक्ष.