बल्लारपूर शहरातील गढूळ व अनियमित पाणीपुरवठ्यावर ‘AAP’चा MJP ला दणका

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर:बल्लारपूर 30 जून २०२५ आम आदमी पार्टी, बल्लारपूर ची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) च्या उपविभागीय अभियंता साहेब यांना शहरातील गंभीर पाणीपुरवठा समस्यांबाबत त्वरित उपाययोजना करण्याच्या मागणी.शहरातील अनेक वॉर्डांत नागरिकांना दिवसेंदिवस शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण होत. शहरातील विविध वॉर्डांतून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून,स्वच्छ व सुरक्षित पाणी हे नागरिकांचे मूलभूत हक्क असून, त्याला बाधा येणे ही शासन व्यवस्थेची मोठी त्रुटी आहे.पाणी सोडण्याच्या वेळेच्या अनियमिततेमुळे देखील नागरिकांचा संताप वाढत आहे. त्यामुळेच जुन्या वेळापत्रकानुसार शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.बल्लारपूर शहरासाठी १०० कोटीं खर्चून बनलेली पाणीपुरवठा योजना नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा करेल अशी घोषना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. परंतु अद्यापही योजना प्रभावीपणे कार्यान्वित झालेली नाही. हे सरकारच्या अपयशाचे स्पष्ट उदाहरण असल्याचे ‘आप’ पक्षाचे म्हणणे आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात नागरिकांना7 मिळणाऱ्या वागणूकीवरही पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्याऐवजी कार्यालयात अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, हे अत्यंत निंदनीय असल्याचे 'आप'ने म्हटले आहे.शहराध्यक्ष रवीकुमार पुपलवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शुद्ध व मुबलक पाणी मिळवणे हे नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत. प्रशासनाने जर याकडे दुर्लक्ष केले, तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत.”निवेदनाच्या शेवटी, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून पाणीप्रश्न सोडवावा, अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळेस शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गंडलेवार, शहर उपाध्यक्ष सय्यद अफजल अली,प्रवक्ता आसिफ हुसेन शेख,सहसंघठनमंत्री सलमा सिद्दीकी,महिला अध्यक्ष किरण खन्ना,महिला उपाध्यक्षा मनिषा अकोले, युथ उपाध्यक्ष स्नेहा गौर, शिक्षण आघाड़ी अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी, ASAP अध्यक्ष सम्यक गायकवाड,सचिव हर्षद खांडागडे,सुशील वासेकर,अजय कोमलवार व इत्यादि उपस्थित होते.