माझेच चित्र काढूनी रंगविले मी,अनाथ ए जिंदगीला गुंतविले मी-मनीष रामटेके

प्रतिनिधी योगेश नारनवरे जलालखेडा
जलालखेडा:कला हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे कलेशिवाय आपण अपूर्ण आहोत कलाच आपल्या भावना मांडते जेव्हा कलेचा विचार केला जातो तेव्हा आपल्या मनात फक्त चित्रकलेचा उदय होतो कलाकार स्वतःला कलाकृतीत दाखवतो कला कलाकाराची ओळख करून देतो असाच एक कलाकार त्याने आपल्या चित्रकलेतून गाव रोशन करत स्वतःची एक चित्रकार म्हणून ओळख निर्माण केली तो कलाकार आपल्या भावना व्यक्त करतो की मी चित्रकार कसा झालो त्याचे नाव आहे मनीष रामटेके एका छोट्याशा गावात जन्मलेला हा मुलगा गाव सोनोली मेंडकी चित्रकलेचा छंद हा माझ्या जीवनात लाभलेला मला छंद आहे कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही की चित्रकलेची कुठलीही परीक्षा दिली नाही मी सातवीत शिकत असताना अभ्यासाकडे लक्ष नसताना मला चित्र काढायचे खूप आवडायचे वर्गातील मुलांना भूमितीचे आलेख काही चित्र सहज काढून द्यायचा इथूनच माझ्या चित्रकला जीवनाला कलाटणी बसली आज मी कोणतेही चित्र हुबेहूब प्रतिकृती काढू शकतो मनातील संकल्पनेनुसार चित्र काढतो मी चित्रातला एक चित्रकार झालो असा मी अनाथ आई वडील मी बघितले नाही मावशीने माझा परत पार केला तीच माझी आई तीच माझे वडील आहे चित्रकलेने मला आर्टिस्ट मनीष रामटेके म्हणून एक माझी ओळख दूरवर प्रसिद्धी करून दिली.एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर त्यापलीकडे शेतकरी सह्याद्रीसाठी उभारलेले नाम फाउंडेशन अभिनेते नाना पाटेकर व अभिनेते अनासपुरे माझी गृहमंत्री अनिल देशमुख आमदार डॉक्टर आशिष देशमुख माजी सभापती सतीश शिंदे त्यांना माझे चित्र आवडले त्यांना सुंदर चित्र काढून त्यांच्यासोबत त्यावर साजसे गझल लिहिली लगेच त्यांचं बोलावन येऊन यावर माझी मुलाखत नाना घेणार आहे चित्रकलेने सारे रंग या अनाथ जिंदगीत भरले.