सालेकसा येथे बस फेऱ्या वाढवून वेळापत्रक लावा शालिनी बडोले यांनी दिले निवेदन

Mon 07-Jul-2025,12:48 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा:सालेकसा तालुका हा पूर्व विदर्भाच्या टोकाला अती दुर्गम भागात येत असून तालुक्यात अजून बऱ्याच गावांमध्ये बस धावत नाही. आपला देश विकसित होत आहे परंतु गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा प्रगतीपासून अजूनही कोसो दूर आहे. गोंदिया वरून सालेकसा साठी फार कमी बस फेऱ्या चालतात, त्यातही सकाळी गोंदिया वरून ८ वाजता सुटणारी डोंगरगड बस बऱ्याच वेळा वेळेवर सुटत नाही आणि काही वेळा तर बस वेळेवर रद्द केली जाते. अशा वेळेस प्रवाशाची गैरसोय होते. म्हणून सकाळी गोंदिया वरून सालेकसा साठी ७.३० वाजता एक बस नव्याने सुरू करावी. सोबतच सालेकसा तालुक्यातील निंबा , पिपरिया, नवाटोला, जांभळी, हलबीटोला, गोरे, मानागड, बीजेपार, धनेगाँव, बंजारी, इत्यादी गावांसाठी बस सुरू कराव्या. तसेच सालेकसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाजवळ आणि आय.टी.आय जवळ कायम स्वरुपी बस थांबा देऊन तसे बोर्ड लावण्यात यावे. तसेच सालेकसा येथील चौकातील बस स्टँड वर बस चे वेळापत्रक लावण्यात यावे. अशी मागणी सालेकसा येथील नागरिक करीत आहेत. त्यासंबंधी पुढाकर घेऊन समाजसेविका शालिनी बडोले यांनी आगर प्रमुख गोंदिया यांना निवेदन दिले आहे.