शेततलावात बुडुन दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यु

Mon 07-Jul-2025,12:42 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

गडचिरोली :- जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात शिरपूर येथे दोन मावस भावंडांचा शेततळ्यात आंघोळीसाठी उतरले असता पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना रविवार ला ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली असुन विहान ज्ञानेश्वर मडावी वय १२ वर्षे रा. शिरपुर ता. कुरखेडा व रुदय ज्ञानेश्वर मडावी वय ९ वर्षे रा. गडचिरोली अशी मृतक मुलांची नावे आहेत. विहान हा सातव्या वर्गात शिकत होता तर रुदय हा तिसर्या वर्गात शिकत असुन विहानचे वडील शिक्षक आहे तर रुदय चे वडील गडचिरोली येथे पोलीस दलात कार्यरथ आहेत.या दोन्ही मुलांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबावर फार मोठे आघात झालेले आहेत. रुदयची मावशी कुरखेडा तालुक्यातील शिरपुर येथे राहत असल्याने तो मावशिकडे आला होता आणी मावशीचा मुलगा विहान आणी स्वतः सायकल घेऊन आपल्या नातलगांच्या शेताकडे गेले व तिथे त्यांना शेततलाव दिसला असता आंघोळीचा बेत करुन कपडे काढुन पाळीवर ठेवले आणी पाण्यात उतरले असतांनाच पाण्याचा अंदाज न लागल्याने त्यांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यु झाला.शेतावरील काही नागरीकांना पाळीवर सायकल व कपडे दिसुन आल्याने सदर घटना ऊघडकिस आली. घटनेची माहीती कुरखेडा पोलीसांना कडताच घटनास्थळ गाठुन मृतदेह उत्तरीय तपासनीसाठी कुरखेडा ऊपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व सदर घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस प्रशासन करीत आहेत