आरमोरी बचाव समिती तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती तहसीलदार यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी शहरात वाढत्या अपघातात निष्पाप लोकांचा बळी आणि दररोज चे अपघात तसेच गडचिरोली- आरमोरी- नागपूर एन एच 353 डी या राष्ट्रीय महामार्गावरील टी पॉईंट ते अरसोडा फाट्या प्रयन्त जिथं काम नसताना दुभाजकावर खुली जागा सुटली असल्याने नागरिक तेथून ये -जा करतात व या महामार्गावर सुसाट गाड्याचा वेग असल्याने येथे वारंवार अपघात होत आहेत, व अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तरी सदर दुभाजकाची दुरुस्ती करण्यात यावी व वाढते अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे,अन्यथा आरमोरी बचाव समिती तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल यासाठी काल दिनांक 3/7/2025 ला तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले,आरमोरी बचाव समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते दिलीप हाडगे,राहुल जुवारे,महेंद्र मने,विजय पेटकुले, ज्ञानेश्वर पत्रे,छाया मानकर, निराशा दुमाणे, वैशाली बीजागरे,आशा खोब्रागडे,मनीषा कामथे आदींनी मागणीचे निवेदन सादर केले!
Related News
खुरसापार शिवारातील शेतकरी भयभीत वनविभागाच्या ऑफिसमध्ये केला तीन तास ठिय्या आंदोलन,
3 days ago | Arbaz Pathan
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेचे नायब तहसिलदार हिंगणघाट यांना दिले निवेदन
04-Sep-2025 | Sajid Pathan
वर्धा जिल्ह्यात ‘वोट चोर मोदी सरकार’ निषेधार्थ भव्य स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅली आयोजित
04-Sep-2025 | Sajid Pathan
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी दिली पिपरिया ग्रा.प. ला भेट
29-Aug-2025 | Sajid Pathan
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन
29-Aug-2025 | Sajid Pathan