परतीच्याअवकाळी पावसाने केले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Mon 27-Oct-2025,03:28 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा 

सालेकसा-गोंदिया भंडारा जिल्हा हा शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळख आहे व या जिल्ह्यात सर्वाधिक,भाताची शेती केली जाते गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी अधिक असताना 90 टक्के हे शेतकरी वर्ग धान पिकावर अवलंबून आहेत मात्र हातात आलेला घास हिसकावून घेतल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडलेला आहे परतीच्या अवकाळी पावसाने परत नुकसान झाले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी सुरू केली असून धान पाण्याखाली आलेला आहे अशीच अवस्था सतत राहिली तर धानाला अंकुर सुद्धा येण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे आधीच मावा तुडतुडा करपा गात या रोगाने धानावर खूप मोठ्या प्रमाणावर रोगाच्या प्रादुर्भाव पहावयास मिळत होता तर दुसरीकडे आता परतीच्या अवकाळी पावसाने सुद्धा झोडपल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात आला असून खाजगी व्यापारी व सावकाराकडून कर्ज घेतलेले परतफेड कसे करावे हा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे तसेच खरीप हंगामातील बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे आले नसून रब्बी हंगामाचे पैसे सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले नाही विशेष म्हणजे रब्बी हंगामात उन्हाळी पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते परंतु आतापर्यंत त्यांनाही शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली नाही शासनाने सरसकट परतीच्या पावसाने आलेल्या व शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या बळीराजांना सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणीही शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

बॉक्स

 दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री इंद्रनील नाईक हे सध्या पहिल्यांदाच पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यावर गोंदिया ला येत आहेत मात्र ते शेतकऱ्याच्या हिताकरिता किती योग्य निर्णय घेतात व दिनांक 25 ऑक्टोंबर 2025 च्या रात्री झालेल्या परतीच्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये ते काय भूमिका घेतात यावर याकडे सुद्धा शेतकऱ्यांचे लक्ष वेधूले आहे.

 प्रतिक्रिया

 मजुरांच्या तुटवडा असल्याने काही शेतकऱ्यांनी मशीनच्या सहाय्याने धान कापणी केलेली आहे मात्र परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले असून शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी.

 आशिष बनोठे मोहाटोला किसान

 प्रतिक्रिया

 यासंदर्भात भ्रमणध्वनी वरून अधिक संपर्क केला असता काल झालेल्या 25 ऑक्टोबरच्या रात्री शेतकऱ्यांचे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे,याबाबत मी मुख्यमंत्री महसूल मंत्री, कृषी मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. सालेकसा, आमगाँव,देवरी या तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी धान लावलेल्या धान पिकाची नुकसान भरपाई देऊन शासनाने सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी याकरिता मी या विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून मागणी केलेली आहे.

 संजय पुराम आमदार आमगाँव- देवरी विधानसभा क्षेत्र

 प्रतिक्रिया

 यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता मी संबंधित तलाठी यांना धान पीकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत.

तहसील नरसय्या कोंडागुरले तहसीलदार सालेकसा