सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आसिफ खान यांचे कफन-दफन प्रतिकात्मक आंदोलन — प्रशासनाने घेतली दखल, मागण्या मान्य
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा :दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावरील रोडचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात कफन-दफन प्रतिकात्मक आमरण उपोषण आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे आणि उपअभियंता चंदिले साहेब यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी आसिफ खान यांच्या सर्व मागण्यांची पूर्तता लेखी स्वरूपात करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर प्रशासनाच्या लेखी हमीच्या पार्श्वभूमीवर आसिफ खान यांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि प्रशासनाचे आभार मानले.
या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजातील ढिलाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने डांबरीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.