इतिहास विषयाचा ब्रीज कोर्स कार्यक्रम संपन्न

Mon 07-Jul-2025,08:53 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी राहील शेख काटोल 

काटोल:नबीरा महाविद्यालय, काटोल जि. नागपूर येथे दिनांक 02 जुलै 2025 रोज बुधवारला सकाळी 10.00 वाजता महाविद्यालयातील व्हि. एस. पांडे कॉन्फरन्स हॉल मध्ये इतिहास विषयाचा ब्रीज कोर्स संपन्न झाला. मानव्येशास्त्र विभागातर्फे दिनांक 23 जून ते 03 जुलै 2025 पर्यंत शैक्षणिक सत्र 2025–26 मधील प्रवेशित बी. ए. भाग प्रथमच्या विद्यार्थ्या करिता विविध विषयाचा ब्रीज कोर्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 02 जुलैला संपन्न झालेल्या इतिहास विभागाच्या ब्रीज कोर्स प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बेहनियासर, विशेष अतिथी प्रा. डॉ. पाठक मॅडम, प्रा. सलामे सर, तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चंदू देशपांडे सर, प्रा. डॉ. कडबे सर, प्रा. किनकर सर उपस्थित होते. तसेच कला शाखेचे सर्व प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व द्वीपप्रज्वलाने करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉ. पाठक मॅडम, डॉ. सलामे सर, डॉ. कडबे सर व प्रा. भक्ते सर यांनी इतिहास विषयाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इतिहास विषयाचा ब्रीज कोर्सचे मुख्य प्रवक्ते डॉ. चंदू देशपांडे सर यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षात स्वागत करीत वार्षिक महाविद्यालयीन नियमांचे पालन व इतिहास विषयाचे महत्व, फायदे विद्यापीठीय शिक्षण व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 याबद्दल विस्तृत माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून प्रा. बेहनिया सर यांनी इतिहासावर प्रकाश टाकला.कार्यक्रमांचे संचालन इंग्रजी विभागातील प्रा. मनीष लाड सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. हरीशकुमार किनकर सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन इतिहास विभागाच्या वतीने प्रा. दोडके सर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. विनोद वंजारी सर, प्रा. गुरुदास नेहारे सर, प्रा. सायवानकर सर, प्रा. चेतन राठोड सर, त्याचप्रमाणे बी. ए . शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाला 75 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीने कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.