वर्धा विधानसभा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

Wed 05-Nov-2025,05:27 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक

वर्धा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक आढावा बैठक मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा काँग्रेस मुख्यालय, इंदिरा सदभावना भवन, बॅचलर रोड, वर्धा येथे संपन्न झाली.

या बैठकीचे अध्यक्षस्थान विधानसभा प्रभारी अतुल कोटेचा (सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांनी भूषविले. कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्या नेतृत्वात मान्यवरांची उपस्थिती होती.

बैठकीत अतुलजी कोटेचा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत आपण एकजुटीने लढलो, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकमताने, संघटितपणे लढल्या पाहिजेत. भ्रष्टाचार आणि प्रशासनातील गोंधळ जनतेसमोर ठळकपणे मांडणे ही आपली जबाबदारी आहे.”

या वेळी शेखर शेंडे, डॉ. अभुदयदादा मेघे, सौ.हेमलता मेघे, सौ.अर्चना भोमले, सौ.अरुणा धोटे यांसह इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

बैठकीदरम्यान वर्धा शहर व नगरपरिषद हद्दीतील सर्व इच्छुक उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. वर्धा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी शहराचा संघटनात्मक आढावा सादर केला. शहर बैठकीचे आभार श्री. सुधीरभाऊ पांगुळ यांनी मानले.

वर्धा ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी तालुकाध्यक्ष धैर्यशील जगताप यांनी ग्रामीण भागाचा आढावा सादर केला. तसेच प्रभारी अतुलजी कोटेचा यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले. ग्रामीण बैठकीचे आभार सागरभाऊ सबाणे यांनी मानले, तर सूत्रसंचालन श्रीकांत धोटे यांनी केले.

या आढावा बैठकीचे नियोजन विजयभाऊ नरांजे,नंदकुमारभाऊ कांबळे आणि सौ.सोनली कोपूलवार यांनी केले.

बैठकीत वर्धा विधानसभेतील ब्लॉक अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.