एकोरी वार्डमध्ये विदेशी दारू जप्त : दारूबंदीच्या दिवशी शहर पोलिसांची मोठी कारवाई

Fri 03-Oct-2025,10:57 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : २ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंतीनिमित्त राज्यात दारूबंदी असताना, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या डि.बी. पथकाने एक मोठी कारवाई करून अवैध विदेशी दारू जप्त केली.

पो. उपनि. दत्तात्रय कोलटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एकोरी वार्ड येथील सुनिलकुमार राजकुमार मुल्ले (वय ५६ वर्ष) यांच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. छाप्यात तब्बल १ लाख ५४ हजार ४९० रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा मिळून आला. दारूचे दुकान बंद असूनही आणि दारूबंदीच्या दिवशीही आरोपीने अवैध दारू साठवून विक्रीसाठी ठेवली असल्याने माल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा क्र.७२३/२०२५ कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनी राजेंद्र सोनवने, पो. उपनि. दत्तात्रय कोलटे, निकोडे, पोहवा लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, मपोहवा भावना रामटेके, नापोअं. कपुरचंद खरवार, पोअं. रूपेश पराते, प्रफुल भैसारे, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, मपोअं. दिपीका झिंगरे व सारीका गौरकार यांनी केले.