सर्पदंशाने बल्लारपूरचा तरुण महेंद्र भडके यांचा दुर्दैवी मृत्यू

Mon 06-Oct-2025,03:29 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : सर्प पकडण्याचा प्रयत्न करताना सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बल्लारपूर शहरात घडली आहे. महेंद्र भडके (वय ३२), रा. विद्यानगर वार्ड, सावित्रीबाई फुले चौक, बल्लारपूर असे मृत सर्पमित्राचे नाव आहे.

ही घटना आज सकाळी अंदाजे १०.३० वाजता घडली. बल्लारपूर पेपर मिल परिसरातील न्यू कॉलनी येथील नर्सरीमध्ये नाग जातीचा सर्प दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर महेंद्र भडके हा सर्प पकडण्यासाठी तेथे गेला होता. पकडण्याच्या प्रयत्नात असताना सर्पाने त्याला दोन वेळा दंश केला.महेंद्रला तातडीने ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले.मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात येत होते. दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

महेंद्र भडके हे शहरातील ओळखलेले सर्पमित्र होते. विविध भागात साप पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडण्याचे कार्य ते सातत्याने करत असत. त्यांच्या अकस्मात निधनाने बल्लारपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.