पिरीपाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदाची धुरा डॉ राजकुमार शेंडे यांच्या खांद्यावर

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी:सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे, सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी विचारवंत व बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक माजी प्राचार्य डॉ.राजकुमार शेंडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सदर नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केली असून त्याबाबतचे नियुक्तीपत्रही डॉ.राजकुमार शेंडे यांना प्रदान करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात माजी प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी गेले कित्येक वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये काम केले आहे. विविध क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षात घेता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे यांनी डॉ.राजकुमार शेंडे यांच्या खांद्यावर तीन वर्षाकरिता जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविली आहे. पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या सल्लामसलतीने जिल्हा कार्यकारणी व जिल्ह्यातील तालुका कार्यकारणी गठीत करण्याचे अधिकार डॉ राजकुमार शेंडे यांना बहाल करण्यात आले असून जिल्ह्यात पक्षवादीसाठी प्रयत्न करावा असेही नियुक्ती पत्रात म्हटले आहे.जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देतेवेळी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत जयदीप कवाडे ,प्रमोद खोब्रागडे ,मुरलीधर भानारकर, व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.