पर्णा सहकारी साखर कारखान्याची ४७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

प्रतिनिधी:- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली :-वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्याची ४७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२२/०९/२०२५ रोजी दु. २.०० वा. सुरु झाली. सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनिलराव कदम यांनी केले. कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांनी विषयपत्रिकेप्रमाणे एक एक विषय सभेपुढे मांडले त्या सर्व विषयांना सभेने मान्यता दिली.अध्यक्षांनी आपला ऊस आपल्याच पुर्णा कारखान्याला देऊन कारखान्याचे ऊस गाळपाचे उद्दीष्ट पुर्ण होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच भविष्यात AI (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग ऊस शेतीमध्ये करुन ऊसाचे उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऊसविकास योजनेमध्ये सभासदांनी सहभाग घ्यावा असेही आवाहन यावेळी अध्यक्ष महोदयांनी केले. यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजुभैया नवघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कारखान्याचे शेती व ऊसविकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केले.
यावेळी माजी मंत्री गणेशराव दुधगांवकर, माजी आमदार पंडीतराव देशमुख, वसमत कृषी उत्पन्न् बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, जेष्ठ सभासद भगवानराव आलेगांवकर, महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक बेडसे व बँक स्थायी अधिकारी राऊत, कारखान्याचे सर्व संचालक, प्र. कार्यकारी संचालक के. पी. आकुसकर व सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळी-मेळीच्या वातावरणात सभा संपन्न् झाली. सभेच्या शेवटी राष्ट्रगीत घेण्यात आले. आभार प्रदर्शन शहाजीराव देसाई यांनी केले