सालेकसा तालुका आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-सालेकसा तालुका हा दुर्गम तालुका असून ह्या तालुक्यात काही भागात कीटकजन्य व जलजन्य आजारांच्या प्रसार होते ह्या पोषक वातावरण चा तालुका आहे. राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग, आणि काळाआजार यांना समावेश होतो. पावसाळ्यात डासांची प्रजनन चा वेळ असतो.ज्याच्यामुळे डासांच्या संख्येत वाढ होत असते. आणि कीटकजन्य आजारांच्या रोगीची संख्या मध्ये वृद्धी होत आहे.तालुका नियंत्रण पथक सालेकसा चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील आत्राम यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी योग्य कारवाई केली जात आहे. कीटक शास्त्रज्ञ नरेंद्र नागपुरे यांच्याद्वारे विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये तालुक्यातील शाळा, सर्व गावात , महाविद्यालय येथे कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येत आहे. मार्गदर्शन शिबिरात गप्पी मासा लारवा च्या प्रात्यक्षिक दाखवून कीटकजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना जनजागृती करण्यात येत आहे. सर्व आश्रम शाळा व मलेरिया संवेदनशील क्षेत्रात RDK द्वारा जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. तालुका नियंत्रण पथक सालेकसा द्वारे टीम बनवून सर्व उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दौरा करण्यात येत आहे. कीटक शास्त्रज्ञ द्वारा सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहायक आणि आशा कार्यकर्ता सर्वांना प्रशिक्षण दिला जात आहे. तालुका आरोग्य अधिकारी सालेकसा कार्यालया मार्फत सर्व नागरिकांना आह्वान करण्यात येत आहे की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावे आणि काही असल्यास संपर्क साधावे.