हिंगणघाट : बहुचर्चित अंकीता जळीतकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण
पाच फेब्रुवारीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लागले लक्ष !
निकालाची औत्सुकता बाकी
प्रतिनिधी:निखिल ठाकरे
हिंगणघाट:- बहुचर्चित अंकीता जळीतकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले असून या प्रकरणाचा निकाल येत्या पाच फेब्रुवारीला लागणार असुन सर्वाचे निकालाकडे लक्ष वेधले आहे.प्रा.अंकीता जळीतकांड प्रकरणात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे यूक्तीवाद पूर्ण झाला असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश भागवत यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे यूक्तीवाद सुरू होता,तो २१ जानेवारी ला पूर्ण झाला या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे २९ साक्षीदार तपासण्यात आले,परिस्थिती जन्य पूराव्याच्या आधारे न्यायालय या प्रकरणाचा निकाल देईल असा विश्वास अँड.उज्वल निकम यांनी दिला.प्रा.अकीता पिसुड्डे हिचा दोन वर्षे पूर्वी दोन फेब्रुवारी २०२० ला निर्घृण हत्या करण्यात आली, होती १० फेब्रुवारीला तिचा उपच्यार दरम्यान नागपूर येथील ऑरेंज सिटीमध्ये जिवण संघर्ष संपला होता अंकीता जळीतकांड प्रकरणात पोलिसांनी आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे यांच्यावर भारतीय दंड विधानानूसार आरोपी निश्चित केले होते,या निर्गुण प्रकाराचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले होते गून्हेगारीला त्वरित फासावर द्या या मागणीसाठी सर्वत्र मोर्चे व निदर्शने केली होती पिडीत अंकीता व आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी आहेत.अंकीता चा मृत्यूदेह ज्या वेळी दारोडा येथे अंत्यसंस्कारासाठी आणला होता त्यावेळी संतप्त गावकऱ्यांनी रुग्णवाहिका व पोलीसावर दगडफेक केली होती शासनाला लोक आग्रहापूढे झूकून या प्रकरणाची जलद चौकशी करण्यात आली ,यावेळी सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट उज्वल निकम अँड.दीपक वैध यांनी भाग घेतला बचाव पक्षातर्फे अँड. भूपेंद्र सोने,शुभांगी कोसार,अवंती सोने व सुदापे मेश्राम यांनी सहकार्य केले या प्रकरणाचा निकाल येत्या ५ फेब्रुवारी ला असून सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.