मोबाईल चोरी प्रकरणाचा पोलीसांनी केला पर्दाफाश
प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा
वरोरा:- वरोरा शहरातील देशी भट्टिजवळ असलेल्या एका मोबाईल शॉपी मध्ये दि.१७डिसेंबर रोजी काही अज्ञात आरोपीने अमित प्रकाश नाहर यांच्या मोबाईल शॉपि मधील दुकानात रात्री चे सुमारास दुकाणाचे शटर तोडुन अज्ञात आरोपीनी चोरी करुन दुकाणातील १०,७१००० रुपयाचे मोबाईल चोरी प्रकरणात पोलिसांनी आपले चक्रे फिरऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली. वरोरा पोलीसांचे तपास पथक याना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून , तपासाची चक्रे फिरवुन पो.स्टे. परीसरातील सी.सी.टि.व्ही फुटेजची वरोरा शहरात पाहनी केली जवळपास १०० चे वर वरोरा शहरातील दुकाणचे व घरांचे सी.सी. टी.व्ही. फुटेजच्या पाहनी करुन, गोपनीय माहितीचे आधारे मोबाईल चोरी प्रकरणातील आरोपी बाबत माहिती घेण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी एक अल्पवयीन बालक हा ता. अजंनगाव सुर्जी जि. अमरावती याला अटक करीत त्याचाकडून 17मोबाईल तर दुसरा अल्पवयीन आरोपी येथिल असल्याचे समजले वरुन सदर ठिकाणी जावुन त्याचा शोध घेतला असता त्याचे ताब्यात गुन्हयातील १७ मोबाईल फोन मिळुन आले तसेच त्यांचे चौकशी मध्ये वरोरा तालुक्यातील अल्पवयीन बालक त्याचे ताब्यात घेऊन एक मोबाईल फोन हस्तगत केला. तसेच त्यांचे ताब्यात ईतर सोहित्य मिळुन आले असा एकुन ८,००,००० रुपयाचा मुददेमाल पोलिसांनी हस्तगत केला.सदरची कारवाई वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, यांचे नेतृत्वात सपोनी शरद एस.भस्मे,दिलीप सुर,संदिप मुळे,प्रशात नागोसे,यादव,मनोज ठाकरे,महेश गावतुरे,सौरभ कुलथे यांनी केली आहे.