आरमोरी आगारात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

Sat 15-Nov-2025,04:55 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली 

आरमोरी- आदिवासी जननायक स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या,जयंती निमित्त सुधीर मसराम यांनी भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा आरमोरी आगारात भेट दिली आगर प्रमुख राठोड यांनी भेट स्वीकारली  

आरमोरी आगार प्रमुख राठोड यांनी मोठ्या उत्साहात क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पेढे वाटप करून यांची जयंती आगारात वाहक चालक प्रवासी यांच्या उपस्थित त साजरी करण्यात आली.

 भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमालाउपस्थित देवराव कोवे, सुधीर मसराम ,विलास गेडाम, जेडी इंगळे, एस मेश्राम ,नागरीकर मॅडम ,ताराबाई लेनगुरे मॅडम,किशोर नंदनवार, रुपेश उईके ,रंजीत बनकर,संकेत शिरसागर ,अनंता डोनाडकर प्रवासी आणि वाहक चालक आणि आगार कर्मचारी उपस्थित होते