चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलचे लोकार्पण

Wed 24-Dec-2025,01:40 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा खनीज विकास प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आलेल्या चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलचे लोकार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., पोलिस अधिक्षक मुम्मका सदर्शन, टाटा ट्रस्टचे संचालक डॉ. कैलाश शर्मा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदावाले आदी उपस्थित होते. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात डॉ. शर्मा म्हणाले, चंद्रपूर आणि आजुबाजुच्या परिसराकरीता आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. आज चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलचे लोकार्पण होत असून या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स, अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होत आहे. रुग्णांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार मयुर नंदा यांनी मानले.

कॅन्सर केअर हॉस्पीटलमध्ये अशा आहेत सोयीसुविधा: चंद्रपूर जिल्हा खनीज विकास प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २८० कोटी रुपये खर्च करून २.३५ लक्ष चौ. फूट एवढ्या जागेवर १४० बेडचे कॅन्सर केअर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्हा खनीज प्रतिष्ठानचा वाटा २१० कोटींचा आहे.सदर रुग्णालयात जनरल वॉर्ड (३० बेड), सिंगल सुट (१ बेड), सिंगल वॉर्ड (४ बेड), शेअरींग वॉर्ड (१२) आहेत. तसेच रुग्णालयात मेडीकल ऑनकोलॉजी, सर्जिकल ऑनकोलॉजी, रेडीएशन ऑनकोलॉजी, हिमॅटो ऑनकोलॉजी, पॅलेटिव्ह अॅन्ड सपोर्टिव्ह केअर, डे-केअर क्युमोथेरपी युनीट, पेन अॅन्ड सिम्प्टन मॅनजमेंट, क्रिटीकल केअर, सीटी स्कॅन, एम. आर. आय., डीजीटल एक्स रे, मॅमोग्राफी, फ्ल्युरोस्कोपी, पॅथेलॉजी अॅन्ड हिस्टोपॅथेलॉजी, बायोकेमेस्ट्री, मायक्रोबॉयलॉली, रेडीएशन ऑनकोलॉजी, मॉलेक्युलर डायग्नोस्टिक, न्युक्लिअर मेडीसीन, फार्मसी अॅन्ड ब्लड बँक, न्युट्रीशन अॅन्ड फिजीओथेरपी, इमरजन्सी अॅन्ड क्रिटीकल केअर सुविधा आहेत.तसेच रुग्णांकरीता ओ. पी. डी. आणि आय.पी.डी सर्व्हिस, मॉड्यूलर ऑपरेशन थेटर, प्रशस्त रिकव्हरी रुम, खाजगी रुम, आयसोलशन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, डे-केअर ट्रिटमेंट एरीया, कौन्सिलिंग अॅन्ड पेशंट एज्युकेशन, इंशुरन्स, कॅशलेस सुविधा, २४/७ सपोर्ट सर्व्हिस सुविधा आहेत.