धानोरा येथे कार्तिक महा उत्सवात भाविक भक्तांची प्रचंड उपस्थिती

Wed 05-Nov-2025,09:45 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधि:मंगेश बावणे मोर्शी            

मोर्शी:मागील कितीतरी वर्षा पासुन कार्तिक महोत्सव धानोरा येथे मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढतीस आहे. या कार्तिक कार्यक्रमात बुधवार दिं ५ नोव्हेंबर रोजी पूर्ण गाव भक्तिमय होते या कार्यक्रमात सायवाडा गावचे परम पूज्य श्री दुधनशेष महाराज यांच्या हस्ते प्रवचन भजन कीर्तन आणि दही हांडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो आणि रॅली पूर्ण गावात फिरवली जातात या दिंडीत बाहेर गावावरून आलेले पाहुणे मंडळीचा सहभाग आला टाळ मृदुंगाचा आवाजात मंत्रमुग्ध होणार्‍या भाविक भक्तांमध्ये उत्साह दिसून आला. सर्वप्रथम कार्तिक समितीचे कार्यकर्ते व महामानव भगवान बिरसा मुंडा दला चे कार्यकर्ते वीणा वादक, मृदुंग वादक, टाळ वादक यांना अक्षित आणि बुक्का लाऊन त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला.आणि त्यांचे स्वागत करण्यात आले. बाहेर गावावरून आलेल्या.श्री दादाजी धुनिवाले वारकरी भजन मंडळ धारूड (म.प्र),श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ चिंचोली गवळी,माॅ दुर्गा महिला भजन मंडळ तळणी,शारदा देवी भजन मंडळ विष्णोरा,वारकरी महिला मंडळ केदारखेडा, या सर्व भजन मंडळानी धानोरा गावाचे आणि बाहेर गावाहून आलेल्या सर्व पाहुण्यांचे पूर्ण लक्ष वेधून घेतले. हा कार्यक्रम कोजागिरी पौर्णिमा पासून सुरुवात होते.आणि रोज सकाळी पहाटे पाच वाजता काकडा आरती आणि दिंडी काढण्यात येते.पहाटे पहाटे हरिनाम विठ्ठल गजरात पूर्ण गाव प्रसन्न होते. आणि कार्तिक पोर्णिमाचा आदल्या दिवशी बाहेर गावचे डांस गुॅप युनियन तसेच धानोरा तरोडा गावचे डांस गुॅप आप आपले डांस सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवतात .कार्तिक पोर्णिमाचा शेवटच्या दिवशी पहाटे पूर्ण गावात सडा,रागोंळी टाकून शोभा वाढवितात आणि भव्य शोभा यात्रा व महाप्रसाद चा कार्यक्रम पार पाडतात