वसमत नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या युतीच्या उमेदवार सौ. सुनीता बाहेती ३३५४ मतांनी विजयी

Sun 21-Dec-2025,11:04 PM IST -07:00
Beach Activities

 (हिंगोली) प्रतिनिधी:-अशोक इंगोले 

 हिंगोली : वसमत येथील आ.राजुभैया नवघरे यांची नगरपरिषदेवर एक हाती सत्ता नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी दि.२१ डिसेंबर रोजी आय. टी.आय. वसमत येथे सकाळी १० वा. मतमोजणीला सुरुवात झाली.

एकूण सहा मतदान फेऱ्या झाल्या सहा मतदान फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनिता मनमोहन बाहेती ह्या ३३५४ मतांनी विजयी झाल्या आमदार राजू भैया नवघरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट व शिवसेना शिंदे गट यांची.

वसमत नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी युती होती नगराध्यक्ष पदासाठी ०१ व नगरसेवक पदासाठी ३० उमेदवार निवडणुक रिंगणात उभे होते. नगर अध्यक्षासह युतीचे १८ उमेदवार विजयी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यूतीचे १८ उमेदवार विजयी, महाविकास आघाडी ०६ उमेदवार विजयी, भा.ज.पा. ०४ अपक्ष ०२ उमेदवार विजयी. युतीच्या विजयी उमेदवारांचे वसमत चे आमदार राजू भैया नवघरे यांनी अभिनंदन केले.

गड आला... पण सिंह गेला !

आज पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत आपला नगराध्यक्ष व सोबत १७ उमेदवार विजयी झाले, हा आनंदाचा क्षण आहे.

पण ज्या काही सहकाऱ्यांचा विजय निश्चित मानला जात होता, त्यांचा निसटता पराभव झाला-आणि तो पराभव केवळ राजकीय नाही, तर मनाला वेदना देणारा आहे.म्हणूनच आज कोणत्याही विजयी मिरवणुकीचा आनंद न घेता, अंगावर गुलाल न घेता, आमदार राजू भैय्या नवघरे यांनी त्या सर्व पराभूत सहकाऱ्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.कारण जवळच्या माणसांचा पराभव म्हणजेच "गड आला... पण सिंह गेला" - हीच आज त्यांच्या मनातील खोल भावना आहे.

पण हेही तितकेच खरे आहे-

आज डोळ्यांत पाणी आहे, पण उद्या तुमच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही.हे केवळ शब्द नाहीत, आमदार राजू भैय्या नवघरे यांचे वचन आहे.