कराटे प्रशिक्षण शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

Sun 14-Dec-2025,05:14 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा : कराटे ही भारतीय पारंपरिक कला विकसित करून तिचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शोधार्थी दर्शनशास्त्र पी.एच.डी. धारक भन्ते ओमप्रकाश बौद्ध यांनी केले. ते समता नगर येथील रमाई बाल उद्यान, वर्धा येथे दिनांक १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित कराटे प्रशिक्षण शाखेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते.

दक्षिण भारतातील पल्लव साम्राज्याच्या कांचीपूरम येथे क्षत्रिय राजपुत्र म्हणून जन्मलेल्या बोधिधर्मन यांनी लहान वयातच राजेशाहीचा त्याग करून भिक्षू होण्याचा निर्णय घेतला व कराटे या कलेचा प्रसार जगभर केला. आज अनेक देशांनी कराटे या कलेत प्रावीण्य मिळवून जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. मात्र आपल्या देशात जन्मलेल्या या पारंपरिक कलेला अपेक्षित महत्त्व दिले जात नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

हा कार्यक्रम स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया संलग्न स्पोर्ट कराटे असोसिएशन, वर्धा जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या स्मिताताई चव्हाण होत्या. विशेष अतिथी म्हणून स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिहान मंगेश भोंगाडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सुरेश वैद्य, उमाताई इंगोले, ज्योतीताई मेश्राम, रमाई बाल उद्यानचे अध्यक्ष वसंतरावजी बोधिले, रवींद्र कांबळे, विशालभाऊ शेंडे, धर्मशील कांबळे, यशवंतजी कांबळे, अरुणभाऊ भोवते, अंकुशभाऊ मुंजेवार, सर्वानंद साहा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या हस्ते बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून तसेच फलकाचे अनावरण करून कराटे प्रशिक्षण शाखेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन स्पोर्ट शोतोकान कराटे-डो महाराष्ट्रचे ब्रांच ॲडव्हायझर सेन्साई चेतन जाधव यांनी केले. प्रस्तावना सेन्साई सिद्धार्थ गजभिये यांनी मांडली. संचालन रामनगर शाखाप्रमुख सेन्साई पूजा गोसटकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय पंच व खेळाडू सेन्साई वाणी साहू यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेन्साई कार्तिक भगत, शुभम राखडे, पियूष हावलदार, आयुषी कुरटकर, भार्गव खेवले, देवांशु लाखे, पियुष सिंग, जानवी नांदुरकर, रुजान बाघमोरे, रोमेशा वाघमारे, प्रतीक कन्नाके, अनिकेत वाघमारे, प्रशिक डंभारे, गायत्री अवसरे आदींनी अथक परिश्रम घेतले.