हिंगणघाटच्या प्रथमेश खोडेची ऐतिहासिक कामगिरी: राष्ट्रीय ग्रॅप्लिंगमध्ये डबल गोल्ड
प्रतिनिधि आसीफ मलनस हिंगणघाट
हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील १६ वर्षीय प्रथमेश किशोर खोडे याने १८ व्या GFI राष्ट्रीय कनिष्ठ ग्रॅप्लिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये अविश्वसनीय यश संपादन केले आहे.
नोव्हेंबर १४ ते १६, २०२५ या कालावधीत हरिद्वार येथील वंदना कटारिया स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या स्पर्धेत प्रथमेशने अंडर-१७, -११० किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करत 'गी' आणि 'नो-गी' या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक जिंकून 'डबल गोल्ड'चा मान मिळवला.
जे.डी. चौधरी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, वाशी येथे शिकणाऱ्या प्रथमेशने आपल्या या यशाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक सुबोध दादा महाबुदे आणि सहायक प्रशिक्षक महावीर वरहारे व स्मिथ श्रावणे यांच्या मार्गदर्शनाला दिले.
"आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून पदके जिंकणे हे माझे पुढील लक्ष्य आहे," असे आत्मविश्वासाने सांगत प्रथमेशने हिंगणघाट आणि महाराष्ट्राचे नाव रोशन केले आहे.