दौलत कुथे ‘नाट्यश्री २०२५’ पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी : नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘महामृत्युंजय वाड्:मय स्पर्धा २०२५’ पुरस्कार वितरण सोहळा दि. ०७ डिसेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोलीच्या सभागृहात उत्साहात पार पडला. साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष लौकिक प्राप्त झाला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते दौलत कुथे यांचा सत्कार. कला व साहित्य क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना ‘नाट्यश्री २०२५’ हा गौरवशाली पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एन. पठान होते. उद्घाटक म्हणून पद्मश्री डॉ. परशुराम खुणे हे होते. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी, समीक्षक व कादंबरीकार प्राचार्य डॉ. शाम मोहरकर (चंद्रपूर), साहित्यिक डॉ. नीलकांत कुलसंगे (नागपूर), उषाकिरण आत्राम (गोंदिया), पत्रकार देशमुख, महेश पातूरकर, नाटककार चुडाराम बल्लारपूरे, दादाजी चुधरी यांचीही उपस्थिती लाभली. या प्रसंगी राजश्री शाहू महाराज अभिनव कला अकॅडमीचे स्नेही विलास गोदोळे, उमेश गजपुरे, संजय बिडवाईकर, बलराम दर्वे, शालिक पत्रे, किशोर हाडगे, रंजीत बनकर, डॉ. रेखलाल कटरे, अरुण चोपकार, प्रा. अशोक भेंडारकर, सत्यवान वाघाडे, गोविंदा बोळणे, दिगांबर कार, कामिनी पेंदाम, शांतीप्रिया दिवटे, रजनी पत्रे, देवयानी कुथे आदींनी दौलत कुथे यांचे अभिनंदन करीत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यापूर्वीही नाट्यकलावंत दौलत कुथे यांना विविध पुरस्कार व सत्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, त्यांचा सत्कार पाहून उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्कृष्टरीत्या पार पडले. याबद्दल नाट्यश्री साहित्य कला मंचाच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.