वर्धा शहर पोलिसांचे मोठे यश!चोरीच्या दोन मोटरसायकलींसह दोघांना अटक

Wed 26-Nov-2025,12:15 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक

वर्धा : वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन वेगवेगळ्या चोरीच्या मोटरसायकलींशी संबंधित गुन्हे उघड करत दोघा आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, हवालदार नरेंद्र कांबळे, पोलीस अमलदार वैभव जाधव आणि श्रावण पवार हे पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खास मुखबिराकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

गिट्टी खदान, बोरगाव मेघे येथे राहणारा फारुख जमील सय्यद याच्याकडे चोरीची मोटरसायकल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने बोरगाव मेघे परिसरातून 10 ते 12 दिवसांपूर्वी चोरी केलेली मोटरसायकल त्याच्याकडे असल्याचे कबूल केले. तपासात ती मोटरसायकल अर्बन बँक समोरून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गुन्हा पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे नोंद असून, ती मोटरसायकल जप्त करण्यात आली.

पुढील कसून चौकशीत आरोपी फारुखने अंदाजे दीड महिन्यापूर्वी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील गजानन नगर येथून आपल्या साथीदाराच्या मदतीने आणखी एक मोटरसायकल चोरी केली असल्याचे उघड केले. त्याचा साथीदार आकाश बालाजी वाकेकर (रा. बोरगाव मेघे) याचे नावही समोर आले.

जप्त केलेला मुद्देमाल

वाहन प्रकार क्रमांक किंमत

हिरो स्प्लेंडर प्लस MH 32 W 1686 ₹20,000

होंडा पॅशन MH 40 AY 8002 ₹20,000

एकूण मुद्देमाल किंमत : ₹40,000

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

कारवाईत पोउनि. शरद गायकवाड, हवालदार प्रशांत वंजारी, हवालदार नरेंद्र कांबळे, महिला हवालदार ज्योती भोपळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार आदींचा सहभाग होता.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार प्रशांत वंजारी करत आहेत.