आर्वीत वृक्षारोपण कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची उपस्थिती

Fri 29-Aug-2025,09:39 AM IST -07:00
Beach Activities

मुख्य संपादक नावेद पठाण 

मो.7415152121

वर्धा:वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यात त्रिशरण बुद्ध विहार भीमसैनिक अशोकराव कुंभारे परिसर, देऊरवाडा रोड, आर्वी येथे आदर्श एकता सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन अनुराग जैन,पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "शिक्षणासोबतच पर्यावरणाचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. निसर्गाचे रक्षण हे आपल्या भविष्यासाठी आवश्यक आहे."कार्यक्रमात शीतला माता देवस्थान परिसरात महिलांनी वृक्षारोपण करून सहभाग नोंदविला.या प्रसंगी चंद्रशेखर ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी),सतीश ढेहणकर (ठाणेदार आर्वी), मिलिंद पाईकराव (खुपीया), परवेज खान (खुपीया पोलीस कमांडो), पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे यांनी केले होते.कार्यक्रमाला संघटनेतील महिला व कार्यकारिणी सदस्य चंदा डोंगरे, चंदा सरोदे, संगीता वानखडे, जय सरोदे, मेघा सरोदे, लता थुल, शोभा टेकाम, रंजना माहुरे, पूजा कोडापे, सीमा गोंडाणे, सुलोचना कुंभारे, शुभांगी कुंभारे तसेच विनोद कांबळे, दिलीप पवार, विनोद सरोदे, राजू डोंगरे, विजय कुंभारे, मंगेश सरोदे, रोहित ठाकूर, निखिल ठाकूर, संदीप सरोदे, राजू नेवारे, सोनू चव्हाण, शोभीत कुंभारे, पूर्वेश गोंडाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.हा वृक्षारोपण उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला.