दिल्लीमध्ये अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक लवकरच.
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
मुंबई : दिल्ली येथे होणाऱ्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन.अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसचे राष्ट्रीय नेते,फाउंडर तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय पांडे यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. या प्रसंगी राष्ट्रीय नेते असद अली (नेशनल जॉइंट सेक्रेटरी) उपस्थित होते.तसेच राजूजी (इन्चार्ज झारखंड स्टेट व नॅशनल जनरल सेक्रेटरी,ऑल इंडिया काँग्रेस कमिटी) यांनीही सहभाग घेतला.बैठकीत अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजावर सविस्तर चर्चा झाली. संपूर्ण भारतात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन देण्यात आले.पत्रकार परिषदेमध्ये हा संदेश देण्यात आला की अखिल भारतीय राहुल गांधी काँग्रेस ब्रिगेडचे संपूर्ण अध्यक्ष यांना लवकरच दिल्लीमध्ये मीटिंगसाठी बोलावण्यात येईल. यासाठी सर्व राज्याध्यक्षांनी दिल्लीच्या मीटिंगसाठी तयारी करावी असा संदेश देण्यात आला.