कारंजा (घा) पोलिसांची मोठी कामगिरी : अवघ्या 2 तासांत खुनाचा गुन्हा उघड; आरोपी अटकेत
कारंजा (घा) पोलिसांची मोठी कामगिरी : अवघ्या 2 तासांत खुनाचा गुन्हा उघड; आरोपी अटकेत
वर्धा | कारंजा (घा) | प्रतिनिधी : युसूफ पठाण
कारंजा (घा) पोलिसांनी तत्परता व अचूक तपासाच्या बळावर खुनाचा एक सनसनाटी गुन्हा अवघ्या 120 मिनिटांत उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
धामकुंड मार्गावर संजय गोविंदराव जाधव यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात समोर आले की, मृतक मागील पाच वर्षांपासून आरोपी मंगेश तायवाडे यांच्या शेतात काम करत होता. कामाच्या वादातून संतापाच्या भरात आरोपीने लाठीने मारहाण करून त्यांची हत्या केली.
घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने स्वतःच्या स्कॉर्पिओ वाहनातून मृतदेह नेऊन गरपीट मार्गावर फेकून दिला होता. मात्र, पोलिसांनी तात्काळ हालचाल करत संशयिताला ताब्यात घेतले व कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रल्हाद मदान यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थापन विशेष पथकाच्या सतर्कतेमुळे आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.