क्रीडा भारती क्लब हिंगणघाट च्या खेळाडूंनी अथलेटिक्स स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगारी

Thu 27-Nov-2025,06:06 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि:नदीम शेख हिंगणघाट 

हिंगनघाट: केंद्र शासन साई व भारतीय अथलेटिक्स फेडरेशन आणि वर्धा जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ‌ अस्मिता लिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी ला हेडक्वार्टर ग्राउंड वर्धा येथे घेण्यात आले होते स्पर्धेला लाभलेले अध्यक्ष डॉ. एम एन मूर्ती कार्यालय व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन तथा प्राचार्य शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय गोंदिया व उद्घाटक अनुराग जैन वर्धा जिल्हा पोलीस अधिकारी तसेच लाभलेले प्रमुख पाहुणे भोजराज चौधरी व्हॉलीबॉल प्रशिक्षक एन आय एस गोंदिया यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली 

या स्पर्धेमध्ये क्रीडा भारती क्लब तथा फायटर प्लॅनेट क्लब हिंगणघाट येथील येथील एकूण 17 खेळाडूंनी सहभाग घेतला व कठीण परिश्रम करत एकूण सात खेळाडूंनी पदक प्राप्त केले.

 पदक प्राप्त खेळाडूंना बक्षीस देण्याकरिता आशा मेश्राम ( छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त फुटबॉल) जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा,प्रशांत देशमुख जिल्हा प्रतिनिधी व दैनिक लोकसत्ता वर्धा तसेच शेख बजीद शेख बशीर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय,वर्धा यांच्या हस्ते गुणवंत आणि पदक प्राप्त खेळाडूंना बक्षीस देण्यात आले त्यात क्रीडा भारती क्लब चे उत्कृष्ट खेळाडू... 

14 वर्षाखालील खेळाडू १. लावण्या जामकुटे रजत पदक. २.गुंजन भुसारी रजत पदक तर १६ वर्षाखालील खेळाडू १. सायली जामकुठे दोन सुवर्ण तसेच एक रजत पथक (६०मी, हाय जम्प , लॉंग जम्प ) २.दीपिका लपती कास्यपदक ६०मी (रनिंग व लॉंग जंप) रजत पदक. ३. दिपाली खुरपडे कास्यपदक ( जावलीन थ्रो इव्हेंट) ४. दुर्गेश्वरी मडावी रजत पदक ( हाय जम्प )५. रेणुका पुरी सुवर्णपदक (जावलीन थ्रो)

 या सर्व खेळाडूंना थेट राष्ट्रीयस्तरावरिल सामन्यात सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. 

या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल क्रीडा शिक्षक ठाकूर सुशांत सिंह गहेरवार परवेज खान सर आशिष वांढरे निशांत एखंडे कबीर महेशगौरी महिला कोच नम्रता दुबे व रूपाली शिरसागर यांनी विजयी खेळाडूंची मनःपूर्वक अभिनंदन केले व येणाऱ्या ट्रायल्स करिता शुभेच्छा दिल्या.