अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन साजरा
प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा:-शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय येथे दि 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासन व समाज कल्याण गोंदिया यांच्या पत्रानुसार 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत हर घर संविधान कार्यक्रम राबविणे आहे. या कार्यक्रमांतर्गतच हा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. मच्छिंद्र नंदेश्वर तर प्रमुख अतिथी पदी ग्रंथपाल प्रा.राहुल कवाडे प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. पुनम ठाकूर व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. संजय बिरनवार हे होते. आपल्या मनोगतामध्ये प्रा.कवाडे यांनी संविधान या विषयावर माहिती दिली त्यानंतर आपल्या मनोगतामध्ये डॉ.ठाकूर यांनी संविधान कशाप्रकारे लिहिले गेले यावर सविस्तर विवेचन केले शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणांमध्ये डॉ. नंदेश्वर यांनी एकूणच संविधानाचे प्रास्ताविक उद्देशिका याबद्दल सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धिंगत केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या समान संधी केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांचे वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गिरीश देशमुख यांनी केले याकरिता महाविद्यालयातील सर्व प्रवेशित विद्यार्थी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.