आरमोरी येथील श्री साई स्कुल ऑफ नर्सिंग जी एन एम चा निकाल ९७ टक्के
जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:आरमोरी श्री साई स्कुल ऑफ नर्सिंग कॉलेज आरमोरी, येथील (जी.एन.एम.) तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ९ ते ११ सप्टेंबर २०२५ ला परीक्षा दिली होती, व ६ नोव्हेंबर २०२५ ला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग आणि पॅरामेडीकल एज्युकेशन मुंबई यांनी निकाल जाहीर केला, यामध्ये श्री साई स्कुल ऑफ नर्सिंग कॉलेज आरमोरी येथील, विद्यार्थ्याचा निकाल एकूण ९७% टक्के लागला आहे.
त्यामध्ये कुमारी. चांदणी विनोद गोंगले हिने ७८.८% टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कुमारी. स्वाती संतोष सेलोटे ७८.८% गुण प्राप्त करून द्वितीय तर कुमारी. योगिता नानाजी बगमारे ७८.६% टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावीला तर कुमारी. दिपाली नानाजी कारंकर हिने ७७.८% टक्के गुण प्राप्त केले आहे. तसेच २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या सर्व उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्याचे नर्सिंग कॉलेजचे संचालक, सुधाकर साळवे यांनी कौतुक केले आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय कॉलेजचे संचालक सुधाकर साळवे, प्राचार्य मृणाल दर्वे , संगम मेश्राम , समीर कांबळे , आचल राऊत ,, प्रतीक्षा क्षीरसागर , अंजली फुलझेले , प्राजक्ता गेडाम आणि कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी भूषण ठकार, चंदा गुरनुले यांना दिले.