यशवंत हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

Mon 24-Nov-2025,03:35 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक

वायगाव (निपाणी) : यशवंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सन 1993–95 च्या दहावी व बारावी बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा दि. 23 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

32 वर्षांपूर्वी या शाळेत शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात स्थापत्य केलेले माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या आनंदाने एकत्र आले व शाळा- कॉलेजमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री. ठाकरे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की,

“विद्यार्थ्यांचे यश हेच संस्थेचे यश आहे. माजी विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण ही काळाची गरज आहे, आणि या मिलनातून मिळणारा आनंद अवर्णनीय आहे.”

मेळाव्यास त्या काळातील विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे माजी मुख्याध्यापक खोडके सर, माजी मुख्याध्यापिका साधना ताई घोडखांदे, प्रा. चाटसे सर, प्रा. ढवळे सर, प्रा. मेंढे सर, माजी शिक्षक लाजुरकर सर, माजी शिक्षिका खेडकर मॅडम, सुनीता धर्मपुरीया मॅडम व झलके मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी व्यवसाय, नोकरी आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव, यशोगाथा आणि भविष्यातील संधींबाबत परस्पर संवाद साधला.

सामूहिक नृत्य, गायन, स्नेहभोजन आणि छायाचित्र सत्रामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली.

उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, मित्रमंडळींसोबत वेळ घालवत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी अनिल अवथरे यांनी केले व सर्वांचे आभार मानले.

स्थानिक माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.