नगरपरिषद निवडणुका लक्षात घेता लावलेले चेक पोस्ट उपयोगी अवैध धंदा करणाऱ्यांना भरली धडकी

Fri 21-Nov-2025,11:21 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी आसीफ मलनस हिंगणघाट

हिंगणघाट:2डिसेंबरची नगरपरिषद निवडणुका लक्षात येता निवडणूक प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे येथील नगर परिषद प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग वर हैदराबाद ते नागपूर रोड वर नांदगाव चौक का च्या जवळ चेक पोस्ट उभारले आहे. हे चेक पोस्ट 24 तास आपले कर्तव्य बजावत असल्याने बाहेरून शहरात येणाऱ्या अवैध धंदेवाल्यांन मध्ये कारवाईची धडकी बसल्याने ते इतरत्र मार्ग पहात आहे. या चेक पोस्टवर नगरपरिषद प्रशासनाचे तीन कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी असे चार जण मिळून चेक पोस्ट वर आपले कर्तव्य बजावत आहे. विशेष म्हणजे दिनांक 21/11/2025 रोजी गावठी मोहा दारू ची TVS Jupiter मोपेड क्रमांक MH 32 AV 7776 च्या डिक्की मध्ये वाहतूक करणाऱ्या इसम नामे विशाल उर्फ गोलू शाम मस्कर राहणार संत कबीर वॉर्ड,हिंगणघाट हया दारू विक्रेत्याला राष्ट्रीय महामार्ग वरील हैदराबाद ते नागपूर रोड वर नांदगाव चौक जवळील SST पथक मधील पोलीस अंमलदार व न. प कर्मचारी यांनी नाकेबंदी दरम्यान रंगेहात पकडून गाडी क्रं MH 32 AV 7776 टीव्हीएस ज्युपिटर व गावठी मोहा दारू असा जु.कि 1,04,500 / रू चा माल मिळून आल्याने पुढील कारवाई करिता FST पथक च्या स्वाधीन केले. सदरची कार्यवाही हि उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आकाश अवतारे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या निर्देशाप्रमाणे प्रशासकीय अधिकारी धबगडे यांच्या मार्गदर्शनात नोडल अधिकारी सोमनाथ जाधव व SST पथक मधील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, न. प कर्मचारी प्रकाश लंके, दिलीप नौकरकार व छायाचित्रकार पंकज बाळापुरे व FST पथक मधील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार प्रवीण बावणे व न. प कर्मचारी प्रेमकुमार पालीवाल, अमर रेवते, महेंद्र शर्मा व छायाचित्रकार गणेश येनोरकर यांनी केली.