पुरस्कार,प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न
नावेद पठाण मुख्य संपादक
प्रबळ इच्छा शक्तीतुन यश प्राप्त शक्य.. लॉ. निखील रोकडे, अध्यक्ष लॉ. क्लब, वर्धा
वर्धा :- जीवनामध्ये यशाचे शिखर गाठायचे असेल तर प्रत्येक मनुष्याला अथक परिश्रम करणे गरजेचे आहे. जो व्यक्ती प्रत्येक समस्यांना तोंड देत हिम्मत न हारता समोर जातो. तोच यशाचे शिखर गाठतो. म्हणुन प्रत्येक व्यक्तीने कर्तव्य प्रबळ इच्छा शक्ती मनात बाळगुन कार्यरत असायला पाहीजे असे प्रतिपादन लॉयन्स क्लब वर्धाचे अध्यक्ष निखिल रोकडे यांनी व्यक्त केले.
ते 16 नोव्हेंबर रोजी शहीद हुतात्मा स्मारक येथे, युनिवर्सल मार्शल आर्ट स्पोर्टस् अॅकेडमी इंडीया द्वारा आयोजीत पुरस्कार प्रमाणपत्र वितरण समारोहाप्रसंगी अध्यक्ष म्हणुन बोलत होते.
यावेळी मंचावर आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन मोहन गुजरकर, सेंट थॉमस् शाळेचे अध्यक्ष विजय सत्यम, गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन मोहीते, आयोजक संस्थापक संचालक कोशी उल्हास वाघ, पालक प्रतिनिधी मकसुद शेख, मार्शल गवळी, श्रीमती लीलाताई वाघ, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
खेळ कुठलाही असो. तो खेळलाच पाहीजे यातुन मिळालेल्या यशातुन प्रेरणा मिळते पुढे हीच प्रेरणा जिवणात पदोपदी कामी येते. असे मत इमरान राही यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडेही विशेष लक्ष दिले पाहीजे. यामुळे आरोग्य क्षमता वाढते अशी भावना कॅप्टन मोहन गुजरकर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी यशस्वी मार्शल आर्ट पटु, कु. सानवी सागर कवडे, खुशी नागुलवार, वेदांतीका गोहाड, समर्थ लाजुरकर, आर्या पाटील, चेतन तिरपुडे, तिनश नेवारे, स्पृहा पोफळी, दिशांत यादव, स्वरनिम राऊत, वाजीद शेख, पुजाश्री रेवतकर, मंगल ढोके, आसावरी देशमुख, अंजली नळे, आरुष इखार, देवांश लांबट, वंशिका पिसुंडे, धनश्री मैंद, राजश्री गजभिये, कन्हैय्या भिसे, सिध्दी पाटील, आरव गुरनुले, अन्नपुर्णा तांदुळकर, साक्षी बोरसरे, अश्वीनी भगत, सिमरन नट, पलक मेश्राम, मिहीर वाघ, प्रेम कंवर, आर्यन छापेकर यांना प्रमुख अतिथिच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.
यशस्वी कार्यक्रमाचे संचालन अमोल मानकर, प्रास्ताविक कोशी, उल्हास वाघ व आभार साहील वाघ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता, वेदांत चौधरी, विक्रान्त गव्हाने, मिहीर वाघ, प्रेम कंवर, आर्यन छापेकर, गोविंद शर्मा, वैष्णवी पांडे, आर्या पाटील, तनुश्री पांडे यांनी अथक परिश्रम घेतले.