जामसाला जवळ ट्रॅक्टर पलटला : १ मृत, २ गंभीर जखमी

Sat 15-Nov-2025,11:36 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील नवीन जामसाला मार्गावर १५ नोव्हेंबर रोजी सकाळी एका ट्रॅक्टरच्या पलटल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी ब्रम्हपुरी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोनांचा उपचार सुरु आहे.

माहिती नुसार, आज सकाळी ६ वाजता वासेरा येथील ट्रॅक्टर चालक सचिन सदानंद बोरकर (२१), शेतमालक दीक्षात शेंडे (३९) आणि शेतकरी प्रणय पेंदाम (२५) हे वासेरा येथून दीक्षांत शेंडे यांच्या शेतात थ्रेसिंगसाठी जात होते. सुमारे ७.३० वाजता नवीन जामसाला टी-पॉइंटजवळ ट्रॅक्टर चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रत्यक्षदर्शकांनी जखमींना सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. येथे डॉक्टरांनी ट्रॅक्टर चालक सचिन बोरकर यांना मृत घोषित केले. एका गंभीर जखमीला चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठवले, तर दुसऱ्याचा उपचार ब्रम्हपुरीत सुरु आहे.

मृतक सचिन बोरकर याला शव विच्छेदन करीता सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात आण्यात आले. या घटनेची चौकशी सिंदेवाही पोलिस स्टेशनचे थानेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.