ओमकार मोहुर्लेची 'राज्यस्तरीय खो-खो' स्पर्धेसाठी निवड

Sun 09-Nov-2025,01:48 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी : जवाहरलाल नेहरु विद्यालय, जोगीसाखरा विद्यार्थी ओमकार नंदकिशोर मोहूर्ले याची 14 वर्षां वयोगट खालील गटात राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच दिनांक 04 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेल्या नागपूर विभागीय खो-खो निवड चाचणी स्पर्धेत ओमकारने उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले.शाळेसाठी 'हा' क्षण अभिमानाचा!

ओमकारची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणे ही केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जोगीसाखरा गावासाठी आणि जवाहरलाल नेहरु विद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. त्याच्या या यशाबद्दल, श्रीकृष्ण मुखरू खरकाटे मुख्याध्यापक,यांनी गुरुनानक सोशल ट्रस्ट, देसाईगंज व विद्यालय यांच्या वतीने ओमकारचे विशेष अभिनंदन केले.

या अभिनंदन सोहळ्याप्रसंगी जी. एच. रहेजा, आय. आर. डोके, एस. आर. हाटवार, शशीकांत खरकाटे , प्रणय माकडे, प्रेमानंद मेश्राम, यशवंत मरापे ,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी ओमकारला पुढील वाटचालीसाठी उत्स्फूर्तपणे शुभेच्छा दिल्या.

 यशाचे श्रेय कोणाला?

आपल्या या नेत्रदीपक यशाचे श्रेय देताना ओमकारने आपल्या आई-वडील, गुरुजन, बडकेलवार सर जिल्हा खो-खो प्रशिक्षक, भास्कर घाताले गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी, तसेच हिरा मोटवानी अध्यक्ष, गुरुनानक सोशियल ट्रस्ट, देसाईगंज आणि ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.

ओमकार मोहुर्ले हा भविष्यात खो-खो क्रीडा क्षेत्रात आणखी मोठे यश संपादन करेल यात शंका नाही, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, दिल्यात