मंदिरात चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद – वर्धा गुन्हे प्रगटीकरण पथकाची यशस्वी कामगिरी

Mon 24-Nov-2025,03:31 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक

वर्धा वर्धा : पोलीस ठाणे वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाने मंदिरात चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली भगवान गौतम बुद्धांची पितळी मूर्ती जप्त करण्यात यश मिळवले आहे.

दिनांक 28 ते 29 ऑक्टोबर 2025 च्या दरम्यान मास्टर कॉलनी येथील रमाई आंबेडकर उद्यानातील बुद्ध विहारामधून अंदाजे 5 किलो वजनाची व 6000 रुपयांची गौतम बुद्धांची पितळी मूर्ती चोरी गेल्याची तक्रार वर्धा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, 21 नोव्हेंबर 2025 रोजी बोरगाव मेघे येथील महारुद्र हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी संशयितांचा शोध सुरू केला. यादरम्यान श्रावण कृष्णाजी खाकरे (वय 64), रा. राजापेठ, नागपूर, ह.मु. पुलगाव हा इसम संशयास्पद हालचाली करताना आढळला.

चौकशीदरम्यान त्याने दोन्ही चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घरी छापा टाकत गौतम बुद्धांची पितळी मूर्ती जप्त करण्यात आली. तसेच कुलूप तोडण्यासाठी वापरली जाणारी आरी व सळाख बांधण्यासाठी वापरण्यात येणारे हुक जप्त करण्यात आले.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून नागपूर व वर्धा जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, शैलेश चाफलेकर, नरेंद्र कांबळे, पवन लव्हाळे, अभिजीत वाघमारे व इतर कर्मचारी सहभागी होते.