सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूर येथे संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अभियंता संजोग मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. देशाच्या लोकशाही मूल्यांची पुनःप्रचिती करून दिल्यानंतर उपविभागीय अभियंता संजोग मेंढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधानातील समानता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूलभूत तत्त्वांचे महत्व सांगताना त्यांनी शासन यंत्रणेतील पारदर्शकता आणि जनसेवेतील बांधिलकी अधोरेखित केली.
यानंतर अभियंते वैभव जोशी, पवन सावरकर, अनिल आंबटकर, लीनता खोरगडे यांनीही संविधान दिनाचे महत्त्व आणि प्रशासनातील उत्तरदायित्वाविषयी विचार मांडले.
कार्यक्रमाला हनीफ कुरेशी, अरविंद कुचनकर, शीतल पोडे, चित्रा, माधवी मेश्राम, हर्षल दासरवार, हरिदास डंबारे, बावणे, गिरडकर, सौदागर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संविधान मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.