अल्लिपुर येथे "नंदी सजावट स्पर्धा २०२५" चे जन युवा मंचा तर्फे आयोजन

Tue 19-Aug-2025,06:45 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा:अल्लिपुर येथील "जन युवा मंच" (शिवपुर ) द्वारा आयोजित नंदी सजावट स्पर्धा २०२५ चे तान्ह्या पोळा निमित्ताने आठवडी बाजाराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.गेल्या चौदा वर्षं पासुन समिती कडुन सदर कार्यक्रमाचे आयोजन/ नियोजन करण्यात येत आहेत.हि स्पर्धा अ गट मोठे नंदी व ब गट लहान नंदी अशी दोन वेगवेगळ्या गटांत होणार आहे.अ गटातील मोठे नंदी ढोल ,ताशांच्या मिरवणूकीत बस स्थानक - गळोबा- स्टेट बँक मागॅ निघून आठवडी बाजाराच्या प्रांगणात येतील.अ गटातील नंदी स्पर्धा ही नंदी सजावट,स्पर्धकांची वेशभूषा, सामाजिक संदेश, देखावा, महाराष्ट्रीयन संस्कृती यावर आधारित आहेत. यावर परीक्षण करून बक्षीसे व भेट वस्तू, टाफी,प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.बस गटातील लहान नंदी स्पर्धा ही नंदी सजावट, स्पर्धकांची वेशभूषा, सामाजिक संदेश यावर परीक्षण करून गुण देण्यात येणार आहे.बक्षीस,भेट वस्तू, प्रमाणपत्र देण्यात येणार व खाऊ वाटप होणार आहेत.लहान नंदी चा तान्हा पोळा दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत संपन्न होणार आहेत.शिंदी पोळ्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर अल्लिपुर तान्हा भरत असल्याने जवळपासच्या खेडे गावातील नागरिक व शहरी नागरिकांची मोठी गर्दी येथे पहावयास मिळत असते.अ गटात १५ बक्षीसे देण्यात येणार आहेत.ब गटात १६ बक्षीसे देण्यात येणार आहेत. दोन्ही गटांचे बक्षीस वितरण कार्यक्रम हा सर्व महिला चे हस्ते व उपस्थितीत संपन्न होणार आहेत.जन युवा मंच चे सव सदस्य तयारीला लागले आहेत.दोन्ही पोळा सण शांततेत पार पडावे असे आवाहन आयोजन/नियोजन समितीने व पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.