बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीत ५५.३१ टक्के मतदान
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक रविवार, २ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील एकूण १७ प्रभागांमधील ३४ नगरसेवक पदांसाठी १८६ उमेदवार रिंगणात होते. शहरातील ९५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
एकूण ५५.३१ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक ७ मध्ये सर्वाधिक ६६.९६ टक्के, तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वात कमी ४८.३९ टक्के मतदान झाले. प्रभाग १ : ५१.०२%, प्रभाग २ : ५५.३३%, प्रभाग ३ : ५५.३३%, प्रभाग ४ : ५४.८७%, प्रभाग ५ : ५०.२९%, प्रभाग ६ : ५४.२५%, प्रभाग ७ : ६६.९६%, प्रभाग ८ : ६२.२०%, प्रभाग ९ : ५३.१७%, प्रभाग १०: ५६.७८%, प्रभाग ११: ४९.९५%, प्रभाग १२: ५६.६३%, प्रभाग १३: ५७.२२%, प्रभाग १४ : ५७.३६%, प्रभाग १५ : ६६.०६%, प्रभाग १६: ५०.८८%, प्रभाग १७ : ४८.३९ % झाले
प्रशासनाच्या माहितीनुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अनुचित घटना न होता, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आणि अत्यंत शांततेत पार पडली. काही प्रभागांमध्ये दुहेरी, तिहेरी तसेच चौरंगी लढतीची उत्सुकता मतदारांमध्ये पाहायला मिळाली.
हक्काच्या मतदानासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दाखवल्याचा आनंद व्यक्त करत निवडणूक प्रशासनाने सहकार्याबद्दल आभार मानले.