बैलबंडीचे चाक व ट्रॅक्टर चे पट्टे चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : जेना परिसरात झालेल्या कृषी साहित्य चोरी प्रकरणात भद्रावती पोलिसांनी गुन्हा उघड करून दोन आरोपींना अटक केली असून एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विनोद उर्फ बिल्लू देवगडे (५८), रा. आंबेडकर वार्ड, भद्रावती, वैभव महादेव दगडी (२९), रा. जेना, ह.मु. भिवापूर वार्ड, चंद्रपूर असे आरोपींचे नाव आहे.२५ सप्टेंबर २०२५ रोजी पंकज राजकुमार देवतळे रा. जेना यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या अंगणातून बैलबंडीची चार लोखंडी चाकं किंमत १६ हजार रुपये तसेच दोन ट्रॅक्टरचे पाच लोखंडी हायड्रोलिक पट्टे किंमत १० हजार रुपये असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी रात्रदरम्यान चोरी केला होता.तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी मिळालेल्या माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध घेत फोर्ड फिगो कार क्रं एमएच ३४ एएम २६१८ किंमत अंदाजे २ लाख ५० हजार रुपये जप्त केली. तसेच २६ हजार रुपयांचा चाक व पट्टे असे एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (वरोरा) संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पो. उपनि. गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, अनुप आस्टुनकर, विश्वनाथ चौधरी, गोपाल आतकुलवार, योगेश घाटोळे, रोहित चिडगिरे, खुशाल कावळे आणि संतोष राठोड यांनी केले.