लोकसहभागातून बांधण्यात आला बंधारा

Wed 10-Dec-2025,02:19 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर 

अल्लिपूर:मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत मौजा काचनगाव येथे बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमाला उपसरपंच सम्राट मुरार, ग्रामपंचायत अधिकारी आत्राम,गजाननराव चिंचुलकर ,कृषि सहायक चौधरी,ग्रा.पं.सदस्य अमितराव खोडे,सुभाष खोडे शा. व्य.समिती अध्यक्ष सतिशराव कापसे,माजी सरपंच शामराव कुंभारे,जंगलु खोडे, विठ्ठलराव चिचुलकर, दिनेश धरमुल,मंगेश खोडे इत्यादी उपस्थित होते. या बंधाऱ्यामुळे जवळपासच्या शेतकऱ्यांना विहिरीच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. आणि अर्थातच पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी हंगाम चे पीक घेण्यास काही प्रमाणात मदत होईल.