शेतकरी नेत्याला शिवीगाळ प्रकरणी नायब तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल

Fri 12-Dec-2025,07:37 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा

चंद्रपूर : शेतकरी नेत्याला फोन करून धमकावणे आणि शिवीगाळ करणे एका शासकीय अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. वरोरा तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांच्याविरोधात शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या तक्रारीनंतर वरोरा पोलीस ठाण्यात काल दि.11डिसेंबर ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेतकरी आंदोलनातून उभ्या राहिलेल्या तक्रारीवरून एखाद्या सरकारी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची घटना असावी. या घटनेमुळे

प्रशासनात खळबळ उडाली आहे.23 आक्टोबर २०२५ रोजी शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी खांबाळा येथे प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २७ आक्टोबर २०२५ रोजी नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांनी सायंकाळी ७:१० वाजता शेतकरी नेते किशोर डुकरे यांना कॉल करुन "कांदा घोटाळ्यात तू

किती पैसे खाल्ले, मला माहीत आहे मी तुझ्या घरी येतो माझ्यासोबत खाजवू नकोस" अशा शब्दांत धमकी देत शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.या घटनेमुळे व्यथित झालेल्या डुकरे यांनी प्रथम 27 आक्टोबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक वरोरा यांना अर्ज पाठवला होता, ज्यावर पुढील कार्यवाहीसाठी तो अर्ज 15 नोव्हेंबरला तहसीलदार, वरोरा यांच्याकडे पाठवण्यात आला.

तहसीलदार वरोरा यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षकांना कळवले की, दाखल केलेल्या तक्रार अर्जावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या तरतुदीनुसार योग्य तो निर्णय घेऊन कारवाई करावी. त्यानुसार, नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या किशोर डुकरे यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार नोंदवली आहे. या गंभीर धमकी आणि बदनामीच्या आरोपांमुळे डुकरे यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर, पोलिसांनी नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर थेट शासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने, सामान्य शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून, या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.